‘सविनय कायदेभंग’ आंदोलन पडले महागात

विनाहेल्मेट दुचाकी चालविण्याने अनेकांना 500 रुपयांचा दंड

पुणे – शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या हेल्मेट कारवाईच्या निषेधार्थ हेल्मेट सक्‍तीविरोधी कृती समितीने “सविनय कायदेभंग’ रॅली काढली. यात विनाहेल्मेट दुचाकी चालवत निषेध करण्याचे ठरले होते. मात्र, यात सहभागी झालेल्यांवरच “नो हेल्मेट’चा दंड आकारण्यात आला आहे. यामुळे बहुतांश चालकांना 500 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात वाहतूक पोलिसांनी हेल्मेट कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. याला विरोध करत हेल्मेट सक्तीविरोधी कृती समितीने याचा निषेध केला आहे. या निषेधार्थ गुरुवारी पत्रकार संघ ते पोलीस आयुक्‍त कार्यालयादरम्यान विनाहेल्मेट दुचाकी चालवत आंदोलन करण्याचे ठरले होते. यासाठी सकाळी 10 वाजता रॅली सुरू झाली. यामध्ये माजी महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, माजी आमदार मोहन जोशी, मनसेच्या नेत्या रुपाली पाटील, धनंजय जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, आदींनी सहभाग घेतला. मात्र, नियमभंग केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी आंदोलकांना चांगलाच धडा दिला आहे.

रॅलीदरम्यान दुचाकींचे नंबर घेत बहुतांश विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच, रॅली सुरू असताना केलेल्या झेब्रा क्रॉसिंगचाही ऑनलाइन दंड लागल्याची शक्‍यता आहे. यामुळे “सविनय कायदेभंग’ आंदोलकांना चांगलेच महागात पडले आहे.

पोलिसांवर कारवाई होणार का?
नियमानुसार दुचाकीवर मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट सक्‍तीचे आहे. मात्र, रॅली सुरू असताना शुटिंग करणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या दुचाकीवर मागे बसलेल्या पोलिसांनी हेल्मेट वापरलेले नव्हते. यामुळे त्यांच्यावर प्रशासन आपल्याच कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का? असा सवाल आंदोलकांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)