“सविता दामोदर परांजपे’ची अमेरिकावारी

अभिनेता जॉन अब्राहम यांची पहिली मराठी चित्रपट निर्मिती असलेला “सविता दामोदर परांजपे’ हा चित्रपट आता विदेशवारी करणार असून हा चित्रपट अमेरिकेतील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. 31 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट अमेरिकेतील चित्रपटगृहांमध्ये शुक्रवारपासून झळकत आहे. हा चित्रपट ऑस्टीन, शिकागो, लॉस एंजिलस, वॉशिंग्टन, सॅन फ्रान्सिस्को, अटलांटा, सिएटेल, डॅलस, पोर्टलॅण्ड, सॅक्रामेंटो, एडिसन या शहरांतील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांमध्ये 1 कोटी रुपयांचा टप्पा गाठल्याचे पाहायला मिळाले. दररोज 410 शोज राज्यभरातील 232 चित्रपटगृहांतून दाखविले जात आहे. ब-याच काळानंतर एक उत्तम थरारपट पाहिल्याचा अनुभव प्रेक्षकांमधून व्यक्त केला जात आहे. अभिनेता जॉन अब्राहम याची पहिली मराठी चित्रपट निर्मिती असून या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी केले आहे. या चित्रपटात सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)