सविंदणेत परिसरात शिवजयंती उत्साहात

सविंदणे ः सविंदणे, कवठे येमाई, मलठण (ता. शिरूर) परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. किल्ले शिवनेरी येथून शिवज्योत आणून सविदंणे येथील शिवजयंती उत्सव मंडळ कामठेवाडीच्या युवकांनी मंडळाचे अध्यक्ष विजय खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांचा, मावळ्यांचा पेहराव परिधान करून गावामध्ये मिरवणूक काढली. कवठे येमाई, मलठण येथे देखील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, शिवाजी महाराज की जय… अशा जयघोषात सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)