सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सुरूवात

पुणे – सनईचे मधुर स्वर.. सादर होणाऱ्या बंदिशी.. गायकांना मिळणारी साथसंगत.. रसिकांची दाद.. मोठ्या संख्येने उपस्थित चाहते.. उपस्थित दिग्गज..महोत्सवाला साजेशी मंडप व्यवस्था..अशा बहारदार वातावरणात 66 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सुरूवात झाली.

कल्याण अपार यांनी राग गावती सनईवादनातून महोत्सवाची सुरूवात केली. त्यांना नवाज मिरजकर व संजय अपार (तबला), अनिल तोडकर, शेखर परांजपे आणि निवृत्ती अपार (सनई), जगदीश आचार्य (सूरपेटी), तुळशीराम अतकरे (स्वरमंडळ), वैष्णवी अवधानी, वैशाली कुबेर (तानपुरा) यांनी साथ केली. “माझे माहेर पंढरी’ हे भजन सनईवर सादर केले. त्यावेळी त्यांना माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथ केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रवींद्र परचुरे यांच्या राग भीमपलासने गायनाने महोत्सवाची बहारदार सुरूवात झाली. त्यांनी सादर केलेल्या पारंपारिक ख्याल आणि श्री रागातील बंदिशीला रसिकांनी दाद दिली. त्यांना प्रवीण करकरे (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), शिवदीप गरूड व सुकृत गोंधळेकर (तानपुरा) यांनी साथ दिली. आपल्या सरोद वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या पंडित बसंत काब्रा यांच्या वादनाने महोत्सवाची सायंकाळ रंगली. त्यांनी सरोदवर राग पुरिया धनश्री सादर केला. त्यांना सुधीर पांडे (तबला), अखिलेश गुंदेचा (पखावज) आणि पर्व तपोधन (तानपुरा) यांनी साथसंगत केली. पं. बसंत काब्रा यांच्या वादनाला रसिकांनी “वन्स मोअर’ दिला.

प्रसाद खापर्डे यांनी राग केदार सादर करत गायनाला सुरूवात केली. त्यांनी सादर केलेल्या “राम भजो भाई’ या भजनाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांना पंडित रामदास पळसुले (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), ह्रषिकेश शेलार, शिवाजी चामनर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. पतियाला घराण्याच्या ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली. त्यांनी “राग जोग’ने गायनाला सुरूवात केली. त्यांच्या बडा ख्याल व छोटा ख्यालला श्रोत्यांनी टाळ्यांनी प्रतिसाद दिला. त्यांना पं. मुकुंदराज देव (तबला), पं. श्रीनिवास आचार्य (हार्मोनियम), विद्या जाईल, शादाब सुलताना खान आणि सचिन शेटे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

महोत्सवातील अन्य कार्यक्रम
– भारतरत्न पं. भीमसेन जोशी : द वोईस ऑफ पीपल’ या डॉ. नागराजराव हवालदार लिखित पुस्तकाचे यावेळी प्रकाशन झाले.
– सतीश पाकणीकर यांच्या स्वरसाधक 2019′ या दिनदर्शिकेचे प्रकाशन श्रीनिवास जोशी, पं. शौनक अभिषेकी, पं. रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे आणि उदय भवाळकर आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. त्याचबरोबर त्यांनी काढलेल्या प्रकाशचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन माउली टाकळकर, पं.अरविंद थत्ते, पं.विजय घाटे यांच्या हस्ते झाले.
– श्रीनिवास जोशी आणि आनंद भाटे यांच्या हस्ते दृकश्राव्य मैफिलीचा समावेश असणारा पेनवीर्ळींश लॉंच करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)