सवर्ण आरक्षण न्यायालयात टिकेल असं मला वाटतं नाही- शरद पवार 

संग्रहित छायाचित्र....

कोल्हापूर – केंद्र सरकारने सवर्ण जातींना १० टक्के आरक्षण दिले आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकेल असं मला वाटतं नाही…अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलीय.तसेच, राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत काँग्रेससोबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

सवर्ण आरक्षण टिकेल याबद्दल शंका
सवर्ण आरक्षणाबाबत पवार म्हणाले, की सवर्ण आरक्षण हे संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का लावणारे आहे असे घटनातज्ज्ञांचे मत आहे. घटनेत आरक्षणाची मर्यादा ५० टक्के आहे. याआधी महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये आरक्षणाचे प्रयोग करण्यात आले होते. पण, हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे हे आरक्षण तरी न्यायालयात टिकेल का याबद्दल शंका आहे. पवार म्हणाले, की हे आरक्षण कुणासाठी हा प्रश्न आहे. याचा लाभ शहरातील काही सुशिक्षीत कुटुंबातील मुलांनाचा होईल. खेड्यातील मुले मात्र या स्पर्धेत मागे पडतील.

निवडणुका समोर ठेवून निर्णय- पवार
आरक्षणाचा निर्णय आत्ताच का घेतला गेला असा प्रश्नही पवारांनी उपस्थित केला. ते म्हणाले, की निवडणुकीला काही महिने बाकी आहेत. जे निर्णय पावणे पाच वर्षात घेतले नाहीत ते आताच का घेतले. त्यामुळे हा चुनावी जुमला असल्याची शंका येते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे पवार म्हणाले.

ज्याची जास्त ताकद त्याला जास्त जागा
यावेळी पवारांनी जागावाटपाबाबत मत व्यक्त केले. ते म्हणाले, की राज्यात ज्याची जास्त ताकद त्या पक्षाला जास्त जागा असे सूत्र असायला हवे. त्यानुसार जागावाटप व्हायला हवे. काँग्रेससोबत आघाडी करण्यासंबंबधी चर्चा सुरू आहे. राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा झाली आहे. देश पातळीवर आम्ही एकत्र येण्याच विचार नाही. पण, राज्य पातळीवर एकत्र निवडणूक लढवू असे पवार म्हणाले. भाजपा सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला असून लोक आता संतापली आहेत अस देखील पवार म्हणाले आहेत.

कोल्हापूर, सातारा लोकसभा उमेदवाराबाबत पवारांचा हिरवा कंदील
कोल्हापूर आणि सातारा लोकसभा मतदार संघात अध्याप कोणता उमेदवार असणार हे स्पष्ट नाहीये. कोल्हापूर येथे गतवेळचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याने त्यांना उमेदवारी देऊ नये अशा भूमिकेत आहेत तर मुंबई येथे झालेल्या बैठकीत चक्क मुश्रीफ यांनीच स्वतः लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे म्हंटले होते. त्यामुळे शरद पवार यांच्यासमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी पवार यांना सातारा आणि कोल्हापूर लोकसभेच्या जागेबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांचा विषय थोडा लांब ठेवला आहे. सध्या लोकसभेच्या ४८ जागांचा विषय होता. त्यातील ४० जागांचा विषय संपला ८ जागांचा विषय बाकी आहे.

प्रत्यक्ष ३ ठिकाणी अडचणी येत आहेत पण त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पैकी बहुमत कोणाला मिळत याची तपासणी सुरू आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यापैकी प्रभावी उमेदवार या ठिकाणी देणार असल्याचे पवारांनी म्हंटले आहे. हसन मुश्रीफ यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, मुश्रीफ हे मोठे नेते आहेत. त्यांचा उपयोग महाष्ट्राच्या विधी मंडळात जास्त होईल. पण त्यांनी घेतलेली भूमिका सुद्धा समजून घेतली जाईल असेही स्पष्ट केले. त्यामुळे पवार यांच्या बोलण्यावरून कोल्हापूरातील धनंजय महाडिक आणि साताऱ्यातील उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत त्यांनी हिरवा कंदील दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

-राष्ट्रवादीचे सभासद व्हायची डी. वाय. पाटील यांची स्वतःची इच्छा – पवार
काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरचे जेष्ठ नेते  डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीचे सदस्यत्व स्वीकारले याबाबत संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. याबाबत विचारणा केली असता पवार म्हणाले, गेले चार वर्षे मागे लागले होते की, मला राष्ट्रवादी चे सभासद व्हायचे आहे. याबाबत त्यांनी सातत्याने आग्रह धरला होता. शिवाय डी. वाय. पाटील हे माझे हितचिंतक आहेत. पक्षाला गरज पडली तर ते आम्हाला मागरदर्शन सुद्धा करतील. ते राजकारणात सक्रिय नसले तरी हितचिंतक म्हणून आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत.

-ठाकरे चित्रपट पाहायला मी जाणार – पवार
भारतातील तीन मोठ्या राजकीय व्यक्तींवर बायोपिक आले आहेत. शिवाय येत्या २३ जानेवारीला दिवशी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे हा चित्रपट येत आहे. याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, चित्रपट बघून मतदान ठरत नाही मात्र शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांनी मला उद्या बाळासाहेब ठाकरे यांचा चित्रपट बघायला मुंबई मध्ये बोलावले आहे आणि मी जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)