सवर्णांना आरक्षण दिले, आता नोकऱ्या द्या ! ; शिवसेनेनं भाजपाला सुनावले

मुंबई: बेरोजगारी हा ब्रह्मराक्षस आहे. गरिबी हा सैतान आहे. या दोन्ही आघाड्यांवर राज्यकर्ते अपयशी ठरतात तेव्हा आरक्षणाचा ‘डाव’ टाकावा लागतो. उत्तर प्रदेशातील सवर्ण मते मिळावीत म्हणून भाजपने हा खेळ केला असेल तर तो खेळ अंगलट येईल. सवर्णांसाठी तुम्ही 10 टक्के जागा राखून ठेवल्यात. पण नोकऱ्यांचे काय? त्या कधी देता तेवढे सांगा. सवर्णांना आरक्षण दिले, आता नोकऱ्या द्या!, अशे शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला सुनावले.

गुजरातमध्ये पटेल व महाराष्ट्रात मराठा समाजाने हाच संघर्ष केला. महाराष्ट्रात ‘मराठा’ समाजास आरक्षण मिळाले आहे, पण नोकऱ्या कोठे आहेत, हा प्रश्न कायमच आहे. नोकऱ्यांचा प्रश्न देशभरात आहे. प्रत्येक वर्षी 80 ते 90 लाख नोकऱ्या निर्माण व्हायला हव्यात, पण सध्या गणित बिघडले आहे. दोन वर्षांत रोजगाराच्या संधी निर्माण होण्याऐवजी घटल्या आहेत व दीड-दोन कोटी रोजगार सरकारच्या ‘नोटाबंदी’, ‘जीएसटी’ धोरणांमुळे बुडाला असल्याचे शिवसेनेनं म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)