सल्लागार नेमण्याची प्रक्रिया फेब्रुवारीत पूर्ण

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार नेमण्यात येणार असून यासाठीची निविदा प्रक्रिया आता फेब्रुवारीत पूर्ण होणार आहे. परीक्षा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी 70 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामाचे सर्व आराखडे तयार करणे, निविदा प्रक्रिया राबविणे, प्रत्यक्ष कामावर देखरेख ठेवणे यासाठी सल्लागार नेमण्यात येणार असून दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र, पुण्यातील केवळ चारच सल्लागार कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. तांत्रिक छाननीत या निविदाच अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. फेरनिविदा मागविण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे.

येत्या 14 जानेवारीला परीक्षा परिषदेच्या वित्त व कार्यासन समितीची बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत फेरनिविदा मागविण्याचा कालावधी निश्‍चित करण्यात येणार आहे. निविदेच्या अटी व शर्तीचा परिषदेकडून पुन्हा अभ्यास करण्यात आला आहे. या अटी व शर्ती सार्वजनिक बांधकाम विभाग व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून तपासून घेण्यात आलेल्या आहेत. आता अटी व शर्तीमध्ये काही बदल करण्याच्या हालचालीही सुरू झालेल्या आहेत. राज्यातील विविध भागातील जास्तीत जास्त सल्लागारांकडून ऑनलाइन निविदा दाखल व्हाव्यात यासाठी परिषदेकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा