सल्लागारावरील चार कोटी खर्च पाण्यात!

कॅगचे एमएमआरडीएच्या कारभारावर ताशेरे
मुंबई – मुंबई महानगर प्रदेश विकास प्रधिकरणाने (एमएमआरडीए) कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ येथील पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी नेमलेल्या सल्लगारावर शुल्कापोटी केलेला 4 कोटी 15 लाख रूपयांचा खर्च पाण्यात गेल्याचा निष्कर्ष भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) काढला आहे. प्रकल्पाचे काम प्रधिकरणाच्या नियोजन विभागाची मंजुरी घेतल्याशिवाय हाती घेतल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॅगचा अहवाल मांडण्यात आला. या अहवालात एमएमआरडीएच्या नियोजन पध्दतीतील त्रुटींवर बोट ठेवण्यात आले आहे. प्रदेशिक आराखड्यात विस्तारीत मुंबई शहर पायाभूत सुविधा प्रकल्पाचा समावेश न करता एमएमआरडीएने सल्लागाराची नेमणूक केली होती, याकडे कॅंगने लक्ष वेधले आहे. अंदाजित 495 कोटी रूपये किंमतीच्या शिरगाव फाटा, पडघा-टिटवाळा-बदलापूर आदी आठ रस्त्याच्या कामात 5 कोटी 3 लाख रूपये इतके सल्लागार शुल्क समाविष्ट होते. या कामासाठी सल्लागाराने प्रथमिक आणि सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केल्यानंतर सल्लागाराला 4 कोटी 15 लाख रूपयांचे देयक प्रदान करण्यात आले.

मात्र, जानेवारी 2017 मध्ये एमएमआरडीएची अभिलेखे तपासल्यानंतर सल्लागाराने अहवाल देऊन दोन वर्षाचा कालावधी उलटून गेल्याचे स्पष्ट झाले. दरम्यानच्या कालावधीत प्रस्तावित रस्त्याच्या बांकामाची संरचना ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांशी जुणणारी नसल्याचे एमएमआरडीएच्या अभियांत्रिकी विभागाच्या लक्षात आले. प्रकल्प अचूक ठरावा म्हणून त्याचा समावेश प्रदेशिक आराखड्यात करण्यासाठी नियोजन विभागाला प्रस्तावित करण्यात आले.
नियोजन विभागाने या रस्त्याचे काम काढून घेण्याची विनंती अभियांत्रिकी विभागाला केली. कारण शिरगाव फाटा ते पडघा असा प्रदेशिक रस्ता सर्वसमावेशक वाहतूक अभ्यासात आधीच प्रस्तावित होता.

त्यामुळे अभियांत्रिकी विभागाने प्रस्तावित केलेल्या नवीन जोडणीचे काम थांबवले. एमएमआरडीएने सर्वसमावेशक वाहतुकीचा अभ्यास मार्च 2008 मध्ये मंजूर केला होता. त्यामुळे मार्च 2013 मध्ये सल्लागाराची नेमणूक करण्यापूर्वी एमएमआरडीएला सर्वसामावेशक वाहतूक आणि मल्टीमॉंडल कॉंरीडॉंरबद्दल माहिती होती असे दिसून येते. एकूणच अभियांत्रिकी विभागाच्या निर्णयामुळे सल्लागार शुल्कापोटीचा खर्च निष्फळ ठरला होता, असे कॅंगने नमूद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)