सलोख्यामुळे दंगलीचा कलंक पुसला

संदीप पाटील : पेरणे येथे पोलिसांतर्फे सन्मान

शिक्रापूर- एक जानेवारी होणारा शौर्यदिनाचा कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी प्रत्येक घटकाने दिलेले मोलाचे योगदान महत्वाचे आहे. सर्व घटकांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे या भागाला यापूर्वी लागलेला दंगलीचा कलंक पुसला गेला ही आनंदाची बाब आहे. यापुढील काळात देखील परस्पर सलोख्याची परंपरा कायम ठेवू, असे मत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले.
पेरणे येथे कोरेगाव भीमा, पेरणे येथील एक जानेवारी रोजी झालेला ऐतिहासिक मानवंदनेचा कार्यक्रम शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये काम करणाऱ्या ग्रामस्थ, विविध संस्था तसेच विविध घटकांचा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विविध ग्रामस्थ, पदाधिकारी तसेच एक जानेवारी कार्यक्रमदरम्यान शांततेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्‍तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड, लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे, पोलीस उपनिरीक्षक आण्णासाहेब टापरे, हनुमंत पडलकर, भरत वेताळ, बाळासाहेब गाडेकर, बाळासाहेब सकाटे, राजेश गायकवाड यांसह आदींचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उंद्रे, पंचायत समिती सदस्या संजीवनी कापरे, कोरेगाव भिमा विजयस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, सरपंच रुपेश ठोंबरे, उपसरपंच रवींद्र वाळके, सचिन कडलग, विशाल सोनवणे, राजू विटेकर, दीपक इंगोले, प्रफुल्ल आल्हाट, विवेक बनसोडे, सागर गायकवाड, गणेश पुजारी यांसह आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पेरणे परिसरातील विजेची व्यवस्था व विकासकामे करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले. यावेळी लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी स्वागत केले तर उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांनी आभार मानले.

  • राजकारण घडामोडीत नसलेल्यांचा सन्मान
    कोरेगाव भीमा, पेरणे येथे मागील वर्षी झालेल्या दंगलीनंतर यावर्षी पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष नियोजन करीत परिसरातील शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक येथील ग्रामस्थांना शांतता टिकविण्यासाठी आणि होणारा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी सहकार्य करत कार्यक्रम शांततेत होण्यासाठी प्रयत्न केले. परंतु पोलीस प्रशासनाच्या वतीने शिक्रापूर पोलिसांच्या आयोजनाने अधिकाऱ्यांच्या हस्ते नागरिकांच्या सन्मानात राजकीय व्यक्‍तींचा हस्तक्षेप होऊन या सर्व घडामोडीत सहभागी नसणाऱ्या व्यक्‍तींचा सन्मान करत सन्मानात देखील राजकारण करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)