सलीम खान यांनी “लव्हयात्री’ इंदौरमध्ये रिलीज होऊ दिला नाही 

आयुष शर्माचा “लव्ह यात्री’ नुकताच रिलीज झाला. शिर्षकाच्या मुद्दयावरून रिलीज होण्याच्या पूर्वीपासूनच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला होता. अनेक संघटनांनी घेतलेल्या आक्षेपामुळे या सिनेमाचे “लव्हरात्री’ हे नाव बदलून “लव्हयात्री’ असे करावे लागले होते. स्वतः सलमान खानचे प्रॉडक्‍शन असलेल्या या सिनेमाला सर्व देशभर एकाच दिवशी रिलीज करण्यात आले असले तरी सलमानचे पिता सलीम खान यांनी मात्र या सिनेमा इंदौरमध्ये रिलीज होऊ दिलेला नाही.

याचे कारण धार्मिक किंवा सामाजिक नसून आर्थिक आहे. फिल्म इंडस्ट्रीला जीएसटी व्यतिरिक्‍त मनोरंजन कर पण द्यावा लागतो. याचा फिल्म इंडस्ट्रीत मोठा विरोध होतो आहे. या भूमिकेला समर्थन देण्यासाठी सलीम खान यांनी “लव्हयात्री’ इंदौरमध्ये रिलीज होऊ दिलेला नाही. इंदौर हे सलीम खान यांचे मूळ शहर आहे हे विशेष. त्यांच्या या भूमिकेची दखल इंदौर नगरपालिकेकडून घेतली जाण्याची अपेक्षा आहे. सलीम खान खूप उदार स्वभावाचे आहेत. सलमान खानच्या “ट्युबलाईट’ला बॉक्‍स ऑफिसवर यश मिळाले नाही, च्यावेळी वितरकांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)