सलमान खान इंदौर मधून राजकीय आखाड्यात ? ; काँग्रेसने केली भूमिका स्पष्ट

नवी दिल्ली: भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या इंदौरमध्ये सलमान खान निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेवर काँग्रेसने आज स्पष्टीकरण दिले आहे.

वरिष्ठ कांग्रेस नेता प्रतापभानु शर्मा म्हणाले, आगामी निवडणुकांसाठी मी इंदौरमधील जागेवर इंदौरचे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत सतत बोलत असून ५ ते ६ काँग्रेस नेत्यांची नावे समोर आली आहेत. मात्र कोणत्याही कार्यकर्त्यांनी सलमान खानच्या उमेदवारी बाबत विचारणा केली नाही, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपकडून अनेक अभिनेत्यांचे नावे समोर येत आहेत. सलमान खानचा जन्म २७ डिसेंबर १९६५ वर्षी इंदौरमध्ये झाला होता. त्यामुळे भाजपचा गड जिंकण्यासाठी काँग्रेसकडून सलमानचा विचार होत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, काँग्रेसनेता शर्मा यांनी खासदार सुमित्रा महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. इंदौरच्या खासदार महाजन त्यांची चांगल्याप्रकारे निभावू शकले नाही. त्यामुळे इंदौर क्षेत्राचा विकास झाला नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)