जोधपुर : काळवीट शिकारप्रकरणात सध्या जामिनावर बाहेर असलेल्या सलमान खानला जोधपूर न्यायालयाने मंगळवारी दिलासा दिला. न्यायालयाने सलमानला २५ मे ते १० जुलै या कालावधीत परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. या कालावधीत सलमान कॅनडा, नेपाळ आणि अमेरिका या तीन देशांमध्ये जाणार आहे.
जोधपूरजवळील जंगलात १९९८ साली दोन काळविटांची शिकार केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ एप्रिल रोजी जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले होते. न्यायालयाने त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून सध्या सलमान जामिनावर बाहेर आहे. निकालानंतर त्याच्या परदेशवारीवर निर्बंध आले होते. सलमानच्या वतीने मंगळवारी जोधपूर न्यायालयात परदेशात जाण्यासाठी परवानगी मिळण्यासंदर्भात अर्ज करण्यात आला. न्यायालयाने सलमानला परदेशात जाण्यासाठी परवानगी दिली आहे.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
What is your reaction?
0
Thumbs up
0
Love
0
Joy
0
Awesome
0
Great
0
Sad
0
Angry