बॉलीवूडची “देसी गर्ल’ प्रियंकाने बिग बजेट असलेल्या “भारत’ चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने अनेक तर्कवितर्क लावले गेले. तिने निकसोबतच्या साखरपुड्याचे मुख्य कारण देत “भारत’ सोडत असल्याचे सांगितले. पण आता एका महिन्यानंतर अशा चर्चा रंगल्या आहेत, की प्रियंकाने हा चित्रपट खुद्द सलमान खानमुळेच सोडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तब्बू आणि दिशा पाटनी यांच्या “भारत’ चित्रपटातील समावेशानंतर प्रियंकासमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. तिला सलमानचा सेटवर उशिरा येण्याचा स्वभावही माहीत होता. दरवेळी चित्रपटाच्या सेटवर सलमान उशिरा पोहचतो. यामुळे प्रियंकाच्या हॉलिवूड प्रोजेक्‍ट्‌सला नुकसान पोहचण्याची शक्‍यता होती. त्यामुळे प्रियंकाने या चित्रपटातून काढता पाय घेतला.

जेव्हा या चित्रपटात दिशा आणि तब्बूचे नाव जाहीर करण्यात आले, तेव्हा मात्र तिने तिच्या निर्णयावर ठाम मत व्यक्त केले. यावरून प्रियंकाने सलमान खानमुळेच “भारत’ सोडल्याचे स्पष्ट होत आहे. यावर सलमान खानने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्याची यावर काय प्रतिक्रिया असेल याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)