सलमान खानच्या “भारत’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

बॉलीवूडमधील टायगर अर्थात सलमान खानचा मोस्ट अवेटेड “भारत’ चित्रपटचा टीझर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासून सलमान खानच्या चाहत्यांसाठी या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

टीझरची सुरुवात सलमान खानच्या आवाजाने होते. “अक्‍सर लोग मुझसे पूछते हैं कि मेरा सरनेम क्‍या है, जाति क्‍या है, धर्म क्‍या है और मैं उनसे मुस्कराकर कहता हूं कि इस देश के नाम पर मेरा बाबूजी ने मेरा नाम भारत रखा। अब इतने बडे नाम के आगे जाति, धर्म या सरनेम लगाकर ना तो अपना और ना ही इस देश का मान कम कर सकता हूं।’ असे म्हणत सलमान खानची धमाकेदार एंट्री होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या एका मिनिटाच्या टीझरमध्ये सलमान नौसैनिक, मॅकेनिक अशा वेगवेगळ्या भूमिकेत दिसत आहे. यामुळे चित्रपटातील सलमानच्या भूमिकेबाबत उत्सुकता आणखीनच वाढली आहे. अली अब्बास जफर यांच्या दिग्दर्शित “भारत’ चित्रपट हा “ओड टू माय फादर’ या कोरियन चित्रपटाचा रीमेक आहे. या चित्रपटात सलमान आणि कतरीना ही जोडी पाच वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहेत. सलमान-कतरीना यांच्याशिवाय तब्बू, दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ आणि सुनील ग्रोवर आदी कलाकार झळकणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)