सलमानला परदेशी जाण्यासाठी प्रत्येकवेळी घ्यावी लागणार परवानगी

जोधपूर – बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला परदेशात जाण्यासाठी यापुढेही प्रत्येकवेळी येथील न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. ही बाब येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने स्पष्ट केली. सुमारे वीस वर्षांपूर्वी दोन काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी सलमानला याआधीच पाच वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याला सलमानने आव्हान दिले आहे.

त्या आव्हान याचिकेवरील सुनावणीदरम्यान सलमानच्या वतीने परदेशी जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागण्यापासून सवलत मिळावी यासाठी अर्ज सादर करण्यात आला होता. प्रत्येकवेळी परवानगी घेण्यात काय समस्या आहे, अशी विचारणा न्यायालयाने केल्यावर सलमानच्या वकिलांनी संबंधित अर्ज मागे घेतला. दरम्यान, सलमानशी संबंधित या प्रकरणातून सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे या बॉलीवूड कलाकारांची याआधीच मुक्तता करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)