सलमानने केलं कतरिनाचं कौतुक

अभिनेत्री कतरिना कैफला बॉलिवूडची दारं खुली करण्यात सलमानचा मोठा वाटा होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये काही काळ प्रेम असल्याची चर्चा देखील रंगली.मात्र कतरिना रणबीर कपूरसोबत लिव्ह इनमध्ये राहू लागली. पण असं असलं तरी सलमान आणि कतरिनाच्या नात्यात कधीही दूरावा आला नाही. किंबहुना अनेकदा सलमानला तिच्याविषयी विचारले असता त्यानं कतरिनाची बाजूच घेतली. या दोघांमधलं प्रेमाचं नातं केव्हाच संपलं असलं तरी मैत्रीचं नातं मात्र सलमाननं पुरेपुर जपलं आहे.

नुकत्याच एका मुलाखतीत सलमानला कतरिनाविषयी विचारले असता त्यानं पुन्हा एकदा तिचं भरभरून कौतुक केलं आहे. कतरिना ही खूपच साधी मुलगी आहे. तिला कोणत्याच बाबतीत अहंकार नाही. अभिनय, नृत्य सगळ्याच बाबतीत ती वरचढ आहे. एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती त्यात स्वत:चे १०० टक्के देते. डान्स शोसाठी देखील तिला दिवसातून किमान चार तास मेहनत करताना मी तिला पाहिलं आहे.’ अस म्हणत सलमानने पुन्हा एकदा कतरिनाचं भरभरून कौतुक केलं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)