सलमानच्या हिरोईनच्या रोलमध्ये दिशा पटाणी

सलमान खानच्या “भारत’ची तयारी जोरात सुरू आहे. पहिल्यांदा या सिनेमामध्ये प्रियांका चोप्राची निवड झाली होती. मात्र् प्रियांकाने हॉलिवूडच्या सिनेमांसाठी वेळ देता यावा म्हणून “भारत’ सोडला आणि तिच्या जागेवर कतरिना कैफची घाईघाईने निवड करण्यात आली. अली अब्बासच्या या सिनेमामध्ये सलमानबरोबर काम करताना आणखी एक ऍक्‍ट्रेस असणार आहे. तिचे नाव आहे, दिशा पटाणी. दिशा “भारत’म्ध्ये सर्कशीतील एका कलाकाराच्या रोलमध्ये दिसणार आहे. तिला लुकही जरा हटके आणि थोडासा हेलनसारखा असणार आहे. हेलनप्रमाणे ती डान्सदेखील करणार आहे. या लुकमधील तिचा एक फोटोही नुकताच व्हायरल झाला आहे आणि प्रेक्षकांनी त्याला खूप लाईकही केले आहे.

“भारत’मध्ये सलमान कतरिना आणि दिशा दोघींबरोबर रोमान्स करताना दिसण्याची शक्‍यता आहे. मात्र दिग्दर्शक अली अब्बास यांच्या मते हा एका सुपरस्टारचा सिनेमा आहे. सिनेमाचा कालावधी 65 वर्षांपेक्षा अधिकचा असणार आहे. सिनेमात सलमानबरोबर फारच थोडा रोल घालवायचा असला तरी सलमानच्या सिनेमात रोल मिळतो आहे, म्हणून दिशाने त्यास लगेच होकार दिला. सलमान, कतरिना आणि दिशा शिवाय सुनिल ग्रोवर आणि तब्बूही या सिनेमात दिसणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)