सलमानच्या “भारत’मध्ये वरुण धवनची एंट्री 

बॉलीवूडचा टायगर अर्थात सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या आगामी “भारत’ चित्रपटात अभिनेता वरुण धवननेही एंट्री केली आहे. पण याची अद्याप अधिकृत पुष्टि करण्यात आलेली नाही. दिग्दर्शक अली अब्बास जफर हे चित्रपटाचे दूस-या टप्प्यातील शूटिंग अबू धाबी येथे करणार आहेत.
अली अब्बास जफर यांच्या “टायगर जिंदा है’नंतर सलमान-कतरिना ही जोडी पुन्हा एकदा एकत्रित काम करणार आहे. माल्टा येथे चित्रपटाचे ब-यापैकी शुटिंग करण्यात आले आहे. दुस-या टप्प्यातील शुटिंगसाठी “भारत’ची टीम अबू धाबीला पोहोचली आहे. हा चित्रपट “ओड टू माई फादर’ या चित्रपटाचा रिमेक आहे. “भारत’मध्यक सलमान खान वेगवेगल्या पाच भूमिका साकारणार आहे. यात सलमान-कतरिना शिवाय दिशा पाटनी, सुनील ग्रोवर आणि तब्बू मुख्य भूमिका साकारणार आहेत. यात आता वरुण धवनच्या नावही जोडण्यात येणार आहे.
दरम्यान, वरुण धवनचा नुकताच प्रदर्शित झालेल्या “सुई धागा मेड इन इंडिया’ला चांगला प्रतिसार मिळत आहे. या चित्रपटात वरुणाने त्याच्या उत्कृष्ट अभिनय केला असून त्याची खूपच स्तुती होत आहे. यात वरुण धवनसोबत अनुष्का शर्माने मुख्य नायिकेची भूमिका साकारली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)