सलमानची कमाई सर्वात जास्त

बॉलिवूडचा “दबंग अॅक्‍टर’ सलमान खानने सलग तिसऱ्या वर्षी फोर्ब्स इंडियाच्या यादीमध्ये स्थान अबाधित राखले आहे. सर्वात जास्त कमाई करणाऱ्या 100 लोकांच्या यादीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ऑक्‍टोबर 2017 ते 30 सप्टेंबर 2018 या वर्षभरात सलमानने सिनेमा, टिव्ही आणि अॅडव्हर्टायजिंगच्या माध्यमातून 253 कोटींची कमाई केली आहे. या यादीमध्ये दीपिका पदुकोणनेही नंबर लावला आहे. तिने याच वर्षभरात 112 कोटींची कमाई करून चौथा क्रमांक पटकावला. फोर्ब्सने ही श्रीमंतांची यादी 2012 पासून प्रसिद्ध करायला सुरुवात केली. तेंव्हापासून पहिल्या पाच क्रमांकात स्थान पटकावणारी दीपिका पहिली महिला बनली आहे. प्रियांका चोप्रा गेल्यावर्षी या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर होती. यावर्षी ती 49 व्या क्रमांकावर घसरली आहे.

क्रीडा विश्‍वातून विराट कोहलीने 228 कोटींच्या कमाईसह दुसरा क्रमांक मिळवला आहे. या यादीमध्ये बहुतेक अॅक्‍टर लोकांचा क्रमांक लागतो. त्याच यादीत दुसऱ्या क्रमांकावर नोंद होणारा विराट पहिलाच खेळाडू आहे. 185 कोटींच्या कमाईचा अक्षय कुमार या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

-Ads-

गेल्या वर्षभरात शाहरुखचा एकही सिनेमा रिलीज झाला नाही. त्याचा परिणाम फोर्ब्सच्या यादीमध्ये शाहरुखच्या क्रमवारीू घसरण झाली. 56 कोटी रुपयांच्या कमाईसह शाहरुख 13 व्या स्थानी, आमिर खान 97 कोटींसह सहाव्या आणि अमिताभ बच्चन 96 कोटींच्या कमाईसह सातव्या क्रमांकावर राहिले आहेत.

या यादीमध्ये महेंद्र सिंह धोनी, सचिन तेंडूलकर, अलिया भट, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ, पी.व्ही.सिंधू, साईना नेहवाल सारख्या अनेक सेलिब्रिटींनी जागा मिळवली आहे. गेल्या वर्षभरात या 100 सेलिब्रिटीजनी मिळून कमावलेली एकूण संपत्ती आहे 3.140.25 कोटी रुपये. गेल्यावर्षीच्या एकूण संपत्तीपेक्षा ही रक्कम तब्बल 2,683 कोटी रुपयांनी अधिक आहे. लोकांनी सिनेमांना कितीही नावे ठेवली तरी सिनेमे बघायला जाणाऱ्यांची संख्या घटलेली नाही. त्यातही सलमानचा चाहतावर्ग अजूनही सर्वात जास्तच आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)