सलमानचा ‘लव्हरात्री’ रिलीज होण्यापूर्वीच वादात

‘लव्हरात्री’ चित्रपटात हिंदूच्या भावना दुखावल्याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनंतर बिहारमधील मुझफ्फरपूरनगर येथील न्यायालयाने अभिनेता सलमान खान आणि इतर 7 जणाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सलमान खानची बहिण अर्पिताचा पती आयुष शर्मा ‘लव्हरात्री’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या टायटललाच काही जणांची आपत्ती दर्शवली आहे. “लव्हरात्री’ हे शिर्षक नवरात्री या महोत्सवाशी साधर्म्य आहे. त्याला जोडून “लव्ह’ हा शब्ध घुसवल्याने आक्षेप घेतला जातो आहे. ‘लव्हरात्री’ विरोधात बिहारमधील मुझफ्फरपूरनगर येथील न्यायालयाने केस दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर मिठनापुर पोलिस ठाण्यात केस दाखल करण्यात येणार आहे.

या केसमध्ये सलमान खान, आयुष शर्मा, वरीना हुसैन, अंशुमान झा, राम कपूरसह 7 लोकांविरोधात केस दाखल करण्यात आली आहे. ‘लव्हरात्री’ सलमान खान प्रोड्यूस करत आहे. तर अभिराज मीनावाला दिग्दर्शन करत आहेत. ही एक लव्ह स्टोरी असून आयुष शर्मा आणि वरीना हुसैन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)