सलग 5व्या आठवड्यात निर्देशांकांत वाढ

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडूनही जोरदार खरेदी

मुंबई: जागतिक वातावरण खराब असूनही भारतीय शेअरबाजारात गेल्या आठवड्यात बऱ्यापैकी खरेदी होऊन निर्देशांक नव्या उच्चांकी पातळीवर गेल्याचे पाहायला मिळाले. गेल्या पाच आठवड्यांपासून निर्देशांक एकतर्फी वाढत आहेत. मात्र, आता निर्देशांक फारच उच्च पातळीवर असल्यामुळे आगामी काळात गुंतवणूकदार सावध राहण्याची जास्त शक्‍यता असल्याचे बोलले जाते. या आठवड्यात देशातील संस्थागत गुंतवणूकदारांबरोबरच परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 198 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्याची आकडेवारी शेअर बाजारानी जारी केली आहे.

क्रुडच्या दरात काही प्रमाणात घट झाली आहे. त्याचबरोबर रुपयाचे मूल्यही या आठवड्यात फारसे घसरले नसल्यामुळे देशातील गुंतवणूकदारांबरोबरच परदेशातील गुंतवणूकदार निवडक खरेदी करीत असल्यामुळे निर्देशांक वाढल्याचे ब्रोकर्सना वाटते. शुक्रवारी देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 142 कोटी रुपयांच्या तर परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 433 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.

सरलेल्या आठवड्यातही सेन्सेक्‍स 303 अंकांनी म्हणजे 0.80 टक्‍क्‍यांनी तर निफ्टी 86 अंकांनी वाढला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मात्र सेन्सेक्‍स 94 अंकांनी तर निफ्टी 25 अंकांनी कमी झाला. या अगोदरच्या चार आठवड्यात तर सेन्सेक्‍स 1676 अंकांनी म्हणजे 4.56 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. या आठवड्यात मुंबई शेअरबाजाराचा मिडकॅप 1.51 टक्‍क्‍यांनी तर स्मॉलकॅप 1.78 टक्‍क्‍यांनी वाढला. या आठवड्यात सरकारकडून काही क्षेत्राची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्याकडे पुढील काळात गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)