सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे महार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई : आजपासून सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने मुंबई- पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी मुंबईकर पर्यटकांनी थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी धाव घेतली आहे. मात्र मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

आज २९ एप्रिल रोजी चौथा शनिवार, उद्या ३० एप्रिल रोजी रविवार, ३० एप्रिलला बुद्धपौर्णिमा तर १ मे रोजी कामगार दिनानिमित्त सलग सुट्ट्या आल्याने नोकरदार वर्ग खुश आहे. यामुळे अनेक जण पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. मात्र महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी खालापूर टोलनाक्यावर अधिकच्या सहा लेन सुरू करण्यात आल्या आहेत. पण वाहनांची संख्या जास्त असल्याने हा उपायही फोल ठरत असल्याचे चित्र आहे. खोपोली घाट ते अंडा पॉईंटपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळत असून बोरघाटापर्यंत ही कोंडी पोहोचली आहे. त्यामुळे दहा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी पर्यटकांना तासभर लागत आहेत. दरम्यान, अवजड वाहने जुन्या मार्गावरून वळवण्यात येत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)