मुंबई: रुपयाचे कोसळणे चालूच आहे. क्रुडचे दर वाढत आहेत. मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता कमी झाली आहे. त्यातच आता सेवा क्षेत्राची उत्पादकता कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली. त्यामुळे आणखी निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी बुधवारी विक्री केल्यामुळे आज सहाव्या दिवशीही शेअरबाजारात घसरण नोंदली गेली.
अमेरिकेच्या कर्ज रोख्यांवरील परतावा वाढत चालला आहे. त्यामुळे वेगाने विकसित होणाऱ्या देशाच्या चलनांची घसरगुंडी चालूच आहे. आजही रुपयाचे मूल्य सकाळी बरेच कमी झाले होते.

क्रुडचे दर 78 डॉलर प्रति पिंपावर गेले आहेत. याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. भारताच्या आयातीचा खर्च वाढून चालू खात्यावरील तूट आणखी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. शियाय सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्यास साफ नकार दिला आहे. त्यामुळे देशात वाहतुकीचा खर्च वाढून महागाई वाढण्याचा धोका आहे.

या सर्व नकारात्मक घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर बाजार बंद होताना बुधवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 139 अंकानी कमी होऊन 38018 अंकावर बंद झाला. ही सेन्सेक्‍सची दोन आठवड्यांची नीचांकी पातळी आहे. आज राष्ट्रीय शेअरबाजाराचा

निर्देशांक निफ्टी 43 अंकांनी कमी होऊन 11476 अंकांवर बंद झाला. गेल्या सहा सत्रात सेन्सेक्‍स 878 अंकांनी कमी झाला आहे. आज ऑगस्टमधील सेवा क्षेत्राची उत्पादकता 51.5 इतकी मोजली गेली आहे. जुलै महिन्यात ती 54.5 टक्‍के होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)