सलग दुसऱ्या वर्षीही मुळा धरण भरणार?

नगर, (प्रतिनिधी) – मुळा धरण यंदादेखील पूर्ण क्षमतेने भरणार असल्याचे सकारात्मक चित्र आहे. पाणीसाठा 21 हजार 500 दशलक्ष घनफूट एवढा झाला असून, नदीपात्रातील आवक लक्षात घेता पंधरवड्यात शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्‍यता आहे. मागील पाच वर्षांच्या कालखंडाचा विचार करता धरण केवळ एकदाच भरले गेले. त्यामुळे लाभक्षेत्राचे साठ्याकडे लक्ष लागले आहे.

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर यंदा मान्सूनने मोठा खंड दिला. जून महिन्याच्या प्रारंभी पावसाने हजेरी लावली खरी; त्यानंतर मात्र तो गायब झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे सर्वांनाच चिंता लागली होती. जुलैअखेर झालेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरला, निळवंडेदेखील भरले. जुलै महिन्यात भंडारदरा भरण्याची किमया झाली खरी. मात्र, मुळाच्या पाणलोटात त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. धिम्या गतीने आवक होत राहिली मात्र धरण भरण्याची चिंता सर्वांना सतावू लागली.

दरम्यान, लाभक्षेत्रात पाऊस लांबल्याने ऐन पावसाळ्यातच आवर्तन घेण्याची वेळ आली. त्यात साडेतीन टीएमसी पाणी खर्च झाल्याने धरणसाठा अवघ्या 15 टीएमसीवर येऊन खालावला. गत आठवड्यापासून पाणलोटासह लाभक्षेत्रात झालेल्या तुफान पावसामुळे आवर्तन थांबविण्यात आले. मुळाच्या पाणलोटात सध्या जोरदार पाऊस बरसत आहे. बुधवारी (दि. 30) कोतूळ येथे मुळा नदी 11 हजार 152 क्‍युसेकने वाहती झाली आहे. धरणसाठा 21 हजार 555 दशलक्ष घनफूट (83 टक्के) एवढा झाला आहे. अशीच आवक कायम राहिल्यास धरण 15 सप्टेंबरपूर्वी भरणार असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. मागील वर्षी याचवेळी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यावेळी मात्र आवर्तन सोडण्यात आले होते.
मागील सहा वर्षांतील धरणाची स्थिती (टीएमसीमध्ये)
सन 2012 ः 17.625
2013 ः 22.779
2014 ः 25.129
2015 ः 20.152
2016 ः 26

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)