सलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत वाढ 

मुंबई – टीसीएस कंपनी पुन्हा बायबॅक करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरच्या शेअरच्या किमती 2 टक्‍क्‍यानी वाढून कंपनीचे बाजारमूल्य 16539 कोटी रुपयांनी वाढून 698408 कोटी रुपये इतके झाले.
कंपनीने शेअरबाजारांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, संचालक मंडळाची 15 जूनला बैठक होणार आहे. या बैठकीत बायबॅकच्या शक्‍यतेवर विचार केला जाणार आहे. मात्र कंपनीने किती शेअरच्या बायबॅकवर विचार केला जाणार असल्याचे सांगितलेले नाही. बायबॅकमुळे शेअरच्या किमती वाढून गुंतवणूकदारांना लाभ होत असतो. कंपनीकडे बरीच रोख शिल्लक असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जाते.

काल बाजारात निर्माण झालेले सकारात्मक वातावरण कायम राहिले आणि निर्देशांकांत वाढ झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा
निर्देशांक सेन्सेक्‍स 46 अंकांनी वाढून 35739 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 13 अंकानी वाढून 10856 अंकावर बंद झाला. निफ्टी 10800 या महत्वाच्या पातळीवर बंद झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी समाधान व्यक्त केले. काल औद्योगिक उत्पादन वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. आयटी कंपन्या व आरोग्य क्षेत्रातील कंपन्याकडे आज गुंतवणूकदारांचा ओढा असल्याचे दिसून आले. गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्‍स 248 अंकानी वाढला आहे. शेअरबाजारांनी जारी केलेल्या माहितीनुसार काल परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 1168 कोटींच्या शेअरची विक्री केली. देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 1327 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)