सलग दुसऱ्या दिवशी रोडरोमिओंना “धडा’

पिंपरी पोलिसांची कारवाई : 35 जण ताब्यात

पिंपरी  – शाळा-महाविद्यालयांसमोर टवाळखोरी करणाऱ्या तरुणांवर पिंपरी पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) कारवाई केली. 35 रोडरोमिओंना ताब्यात घेत त्यांच्यावर मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
पिंपरी पोलिसांनी रोडरोमिओंविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. काल (बुधवारी) 42 रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली होती. आज पुन्हा सकाळी साडेदहा ते दुपारी एकच्या सुमारास रोडरोमिओंची धरपकड मोहीम राबवण्यात आली. तीन महाविद्यालयांबाहेर विनाकारण घुटमळणाऱ्या 35 तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता त्यांचा महाविद्यालयांमध्ये प्रवेश नसल्याचे आढळले. त्यावरून सर्व तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांसमोर त्यांना समज देऊन सोडण्यात आले. तसेच ताब्यात घेतलेल्या तरुणांकडे आढळलेल्या 33 वाहनांची यादी तयार करून पिंपरी वाहतूक विभागाकडे देण्यात आली आहे. वाहतूक विभागाकडून संबंधित वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.

कारवाई दरम्यान पिंपरी पोलिसांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी संवाद साधला. विद्यार्थिनींना येणाऱ्या सामाजिक अडचणी जाणून घेऊन त्याबाबत आश्वस्त करण्यात आले. कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये येत-जात असताना टवाळखोर मुलांकडून त्रास झाल्यास न घाबरता तात्काळ पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन विद्यार्थिनींना करण्यात आले. शाळा-महाविद्यालयांबाहेर घडणाऱ्या अनुचित प्रकारांवर पोलिसांची नजर असून वेळोवेळी अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिली.

विठ्ठल कुबडे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, रामदास मुंढे, वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक उत्कर्षा देशमुख, पोलीस कर्मचारी पठाण, नीलकंठ, ठोंगिरे, यादव, गुजर, खाडे, भोसले, वाव्हळ, पोलीस नाईक ढवळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)