सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात नीचांकी तापमान

पावसाची शक्‍यताही कायम

पुणे – अरबी समुद्र व कर्नाटकच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली असल्याने त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. थंडी काही प्रमाणात गायब, तर ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानातही घट झाली आहे. राज्यात आज सर्वांत कमी तापमान पुण्यातच 15.6 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

गेल्या आठवड्यापासून राज्यात चांगली थंडी पडायला लागली होती. पण, गुरूवारपासून अचानक वातावरणात बदल होऊन तापमान चढ-उतार होत आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे, तर विदर्भाच्या काही भागात किंचित घट झाली आहे. हवामान कोरडे असल्याने थंडीत वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. नगर, नाशिक, खानदेश, मराठवाडा व विदर्भातील काही भागात चांगलाच जम बसविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होत असली तरी, गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात चढउतार सुरू आहे.

बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर आहे. तसेच बंगालचा उपसागर आणि आंध्र प्रदेशचा दक्षिण भाग ते श्रीलंका या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती झाली आहे. हे क्षेत्र कर्नाटक व तमिळनाडूच्या दिशेने सरकत असून ते समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे. त्यामुळे तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ व परिसर, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्‍यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार असून सोमवारपर्यत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)