सलग दुसऱ्या दिवशी निर्देशांकांत मोठी घट

File photo

वेळापत्रकाप्रमाणे देशाच्या बहुतांश भागात पडत असलेला पाऊस वगळता अर्थव्यवस्थेत संबंधात अनेक नकारात्मक घटना घडत असल्यामुळे एकतर गुंतवणूकदार नफा काढून घेत आहेत किंवा कुंपणावर बसून राहणे पसंत करीत असल्याचे वातावरण आहे.
विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजी वित्तीय सेवा

मुंबई, क्रुडचे 78 डॉलर प्रति पिंपापर्यंत वाढलेले दर, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून होत असलेली एकतर्फी विक्रीमुळे रुपयाचे मूल्य आज ऐतिहासिक नीचांकावर गेले. त्यामुळे कालच्या प्रमाणेच आजही रुपयाबरोबर शेअरबाजार निर्देशांकही कोसळले. या आठवड्यात बॅंकाचे अनुत्पादक कर्ज वाढणार असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने सांगितले असल्यामुळे शेअरबाजारात खरेदीसाठी पूरक वातावरण नव्हते. त्यामुळे दूरसंचार आणि धातू क्षेत्र वगळता सर्व क्षेत्राचे निर्देशांक गुरुवारी कमी झाले. तेलाचे दर वाढल्यामुळे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपन्यांना सर्वात जास्त फटका बसला.

अमेरिकेने इराणकइून होणाऱ्या तेलाचा पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर क्रुडचे दर 78 डॉलर प्रति पिंप झाला. त्यातच भारत सरकारने तेल कंपन्यांना पर्याय शोधण्यास सांगितले आहे. कमकुवत रुपया आणि महाग इंधनामुळे महागाई भडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे व्याजदर वाढीची टांगती तलवार कायम राहणार आहे.
गुरुवारी सकाळपासूनच विक्रीचा जोर होता. त्यामुळे एकर वेळ मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 35 हजारांच्या खाली गेला होता. मात्र नंतर काही प्रमाणात निवडक खरेदीचा आधार मिळाल्यामुळे बाजार बंद होताना त्यात थोडी सुधारणा झाली. तरीही कालच्या तुलनेत सेन्सेक्‍स 179 अंकांनी कमी होऊन 35037 अंकावर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 82 अंकानी कमी होऊन 10589 अंकावर बंद झाला. कालही सेन्सेक्‍स 272 अंकानी कमी झाला होता. निफ्टी 10600 या तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाच्या पातळीच्याही खाली गेल्यामुळे गुंतवणूकदारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

क्रुडचे दर आणि जागतिक व्यापार युद्धामुळे भारतातूनच नाही ती इतर विकसनशील देशातूनही परदेशी भांडवल परत जात आहे. त्यामुळे चलनांचे अवमूल्यन होत असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. मात्र, काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअरबाजारात 67 कोटी रुपयांच्या शेअरची त्याचबरोबर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 84 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. जागतिक शेअरबाजारातही आज मंद वातावरण होते.
त्यातच काल रिझर्व्ह बॅंकेने सांगितले की, बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता वाढत जाणार आहे. तसे झाले तर बॅंकांच्या भांडवल पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घेण्याची मनःस्थितीत आहेत. आजही बॅंकांच्या शेअरवर दबाव कायम होता. आयसीआयसीआय बॅंकेचा शेअर आज सर्वांत जास्त प्रमाणात म्हणजे 2.78 टक्‍क्‍यांनी कमी झाला होता कालही या बॅंकेचा शेअर 3.16 टक्‍क्‍यानी कमी झाला होता. मात्र, कालच्या प्रमाणे रुपया घसरत असल्यामुळे आयटी कंपन्या आणि ओैश्री कंपन्या तेजीत आहेत. कारण त्याचा महसूल डॉलरच्या स्वरुपात येत असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)