सलग दुसऱ्या दिवशी आगीची घटना

पिंपरी – महापालिकेच्या मोशी कचरा डेपोला लागलेली आग चोवीस तासानंतरही धुमसत असतानाच, पीएमपीएमएलच्या निगडीतील भंगाराच्या डेपोला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र, भंगार माल जळून खाक झाला.

पीएमपीएमएलच्या निगडीतील भंगाराच्या डेपोला शुक्रवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती कळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. दीड तासांच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

त्यानंतर या डेपोतील जळून खाक झालेले रबर, टायर मटेरियल जेसीबीच्या सहाय्याने पसरविण्यात आले. मात्र, सायंकाळी सहाच्या सुमारास पुन्हा रबरची आग धुमसू लागली. त्यामुळे पुन्हा अग्निशामक दलाच्या बंबांना बोलविण्यात आले. या आगीवर पंधरा मिनिटे पाण्याचा मारा मरुन ही आग नियंत्रणात आणली. या आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, या आगीत नेमके किती नुकसान झाले याची माहिती समजु शकली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)