पिंपरी – स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीच्या विषय पत्रिकेवरील काही विषयांवरुन सत्ताधाऱ्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. आज बुधवारी (दि. 11) झालेल्या स्थायी समिती सभेत काही सदस्य हे विषय तहकूब करण्यावर ठाम होते, तर काही सदस्यांनी विषय तहकूब करायचे असेल तर सभाच होऊ देणार नाही, असा पावित्रा घेत सभा हाणून पाडली. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा स्थायी समितीची सभा तहकूब झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची 4 जुलैची साप्ताहिक सभा तहकूब करण्यात आली होती. धुळे येथील हत्या झालेल्या पाच जणांना श्रद्धांजली वाहून ही सभा बुधवार (दि. 11) पर्यंत तहकूब करण्यात आली होती. ही सभा बुधवारी (दि. 11) दुपारी सुरु झाली. मात्र, सदस्यांमध्ये एकमत न होऊ शकल्याने ही सभा देखील येत्या बुधवारी (दि. 18) दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

दरम्यान, शहरातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणे अपेक्षित असताना, कामानिमित्त महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर या बैठकीला उपस्थित नसल्याने ही चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे येत्या बुधवारी (दि. 18) दोन तहकूब आणि एक साप्ताहिक अशा एकूण तीन सभा होणार आहेत. स्थायी सदस्यांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत.
– ममता गायकवाड, अध्यक्षा, स्थायी समिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)