सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण

मुंबई – सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाली आहे. आज पेट्रोलच्या दरामध्ये ४० तर डिझेलमध्ये ३७ पैशांनी कपात झाली आहे. यामुळे मुंबईत आज पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ८५.९३ रुपये आहे. तर डिझेलसाठी प्रतिलिटर ७७.९६ रुपये मोजावे लागत आहेत. दिल्लीत पेट्रोलसाठी प्रतिलिटर ८०.४५ व डिझेलसाठी ७४.३८ रुपये मोजावे लागत आहेत.

आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. पुढील काही दिवसही अशीच परिस्थिती राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)