सलग तीन महिने धान्य न घेतल्यास थेट शिधापत्रिका निलंबित होणार

आतापर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवडमधील 64 हजार शिधापत्रिका

पुणे – सलग तीन महिने स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकेवर धान्य खरेदी न केल्यास संबंधित व्यक्तीची शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. रेशनच्या धान्यात होणार काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने आधार लिकिंग आणि ई-पॉस यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्याद्वारे ही कारवाई केली जाणार आहे.

-Ads-

सलग तीन महिने धान्य खरेदी न करणाऱ्या शिधापत्रिका धारकाची माहिती थेट पुरवठा विभागाला कळणार असून त्या व्यक्तीची शिधापत्रिका निलंबित केली जाणार आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 64 हजार शिधापत्रिका या प्रकारे निलंबित करण्यात आल्या आहेत.

राज्यात रेशनच्या धान्याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत होता. ते रोखण्यासाठी पुरवठा विभागाने राज्यात सर्वत्र ई-पॉस आणि शिधापत्रिकांना आधार क्रमांकांशी संलग्न केले आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, ज्या शिधापत्रिकाधारकांनी सलग तीन महिने राज्यात कुठेच धान्य घेतले नाही, असे आढळून आल्यास तो लाभार्थी अस्तित्वात नाही, किंवा तो स्थलांतरित झाल आहे, असे समजून ती शिधापत्रिका निलंबित केली जात आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील 11 परिमंडलात 64 हजार शिधापत्रिका निलंबित करण्यात आले. निलंबित शिधापत्रिकाधारकांना त्यानंतर धान्य घ्यायचे असल्यास तीन महिने धान्य का घेतले नाही, याचे स्पष्टीकरण लेखी स्वरूपात द्यावे लागणार आहे, असे शहर अन्न धान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी सांगितले.

2, 61, 760
अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी कुटुंब


8, 800
अंत्योदय योजनेचे लाभार्थी कुटुंब

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अन्न सुरक्षा योजनेचे 2 लाख 61 हजार 760 कुटुंब लाभार्थी असून, अंत्योदय योजनेचे लाभ घेणाऱ्या कुटुंबांची संख्या 8 हजार 800 एवढी आहे. वितरण प्रणाली ऑनलाइन केल्यापासून अन्नसुरक्षा आणि अंत्योदय अन्न योजनेतून 1 हजार 855 मेट्रिक टन गव्हाची, तर 1 हजार 272 मेट्रिक टन तांदळाची बचत झाली आहे, असा दावा मोरे यांनी केला आहे.

…ही कागदपत्रे आवश्यक

सध्या अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आत्तापर्यंत सुमारे 3 हजार अर्ज प्राप्त झाले असून, त्याची तपासणी सुरू आहे. अर्ज करण्यासाठी शहरी भागातील कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपये असणाऱ्या कुटुंबांना शिधापत्रिकेची झेरॉक्‍स, कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्डची झेरॉक्‍स, कुटुंब प्रमुखांचा फोटो आवश्‍यक आहे, असे त्यांनी सांगितले.

What is your reaction?
11 :thumbsup:
4 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
37 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)