सलग तिसऱ्या दिवशी निर्देशांकात वाढ

मुंबई – रूपया मजबुत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात थैळ्या मोकळ्या करीत आहेत. देशातील संस्थागत गुंतवणूकदार तसेच किरकोळ गुंतवणूकदारही खरेदी करीत आहेत. त्यामुळे आज सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकत वाढ झाली. मात्र काही तज्ञाना वाटते की सेसेक्‍सची 30 हजार ही पातळी योग्य आहे. त्यानंतर होत असलेली वाढ ही सूज असल्याचे त्याना वाटते.
आज बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 76 अंकानी म्हणजे 0.25 टक्‍क्‍यानी वाढून 30658 अंकावर बंद झाला. त्याबरोबरच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 13 अंकानी म्हणजे 0.14 टक्‍क्‍यानी वाढून 9525 अंकावर बंद झाला. काल सेन्सेक्‍स 133 अंकानी तर निफ्टी 44 अंकानी वाढला होता. किरकोळ आणि घाऊक दरावरील महागई कमी झाली आहे. काही बड्या कंपन्यानी चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. काल टाटा स्टीलने अतिशय चांगला ताळेबंद जाहीर केल्यामुळे आज या कंपनीच्या शेअरच्या भावात आठ टक्‍क्‍यापर्यंत वाढ झाली. मान्सून केरळात आगोदरचा आला आहे. जीएसटीचे सर्व काही वेळापत्रकाप्रमाणे चालू आहे. त्यामुळे गुंवणूकदार मागे वळून बघायला तयार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)