सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरात वाढ

नवी दिल्ली – कर्नाटकमधील विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरात वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे पेट्रोलचे दर एकूण 46 ते 50 पैशांनी, तर डिझेलच्या दरांमध्ये 48 ते 69 पैशांची वाढ झाली आहे. दरम्यान, कर्नाटक निवडणूकीदरम्यान 19 दिवस हे दर स्थित होते.

दिल्ली आणि मुंबईमध्ये बुधवारी पेट्रोलचे दर 15 पैशांनी, तर दिल्लीत डिझेल 21 पैसे आणि मुंबईत 22 पैशांनी वाढले आहे. आज सकाळी 6 वाजेपासूनच नवे वाढीव दर लागू झाले आहेत. मुंबईतील आजचा पेट्रोलचा प्रतिलीटर दर 82.94 रुपये, तर डिझेलचा दर प्रतिलीटर 70.88 रुपये एवढा आहे.

कर्नाटकमध्ये 12 मे रोजी मतदान झाल्यानंतर लगेचच इंधन दरवाढ सुरू करण्यात आली आहे. कर्नाटकमधील निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतील अशी शक्‍यता यापूर्वीच व्यक्त करण्यात येत होती. गेल्या वर्षी गुजरात निवडणुकांनंतरही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सारख्या कंपन्यांनी तेथे जवळपास 15 दिवस सातत्याने एक ते तीन पैशांची कपात केली होती. मात्र, मतदानानंतर तेथेही दरवाढ झाली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)