बटाटा, पावटाच्या भावात वाढ


मटारचा हंगाम अंतिम टप्प्यात


टोमॅटोचे उतरलेले भाव स्थिर

पुणे- मार्केट यार्डात सलग तिसऱ्या आठवड्यात फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे बटाटा आणि पावट्याच्या भावात दहा ते वीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तर, आवकेत वाढ झाल्याने हिरव्या मिरचीच्या भावात घटले आहेत. वाई, पारनेर, पुरंदर, सातारा येथून येणाऱ्या मटारचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. परिणामी, बाजारात मटारची आवक घटली आहे. त्यामुळे भावात वीस ते तीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. परराज्यातील बाजारपेठांमध्ये स्थानिक भागातून कांद्याची आवक सुरू झाली आहे. परिणामी, येथील बाजारात कांद्याच्या आवकेत वाढ झाली आहे. मात्र, त्याला मागणीही कायम असल्याने भाव स्थिर आहेत. तर, टोमॅटोचे घसरलेले भाव कायम असल्याचे व्यापारी विलास भुजबळ यांनी सांगितले.
रविवारी सुमारे 150 ते 160 ट्रक शेतमालाची आवक झाली. कर्नाटक आणि गुजरात येथून पाच ते सहा ट्रक कोबी, गुजरात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथून 20 ते 22 टेम्पो हिरवी मिरची, बेंगलोर येथून दोन टेम्पो आले, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून तीन ते चार टेम्पो शेवगा, इंदौर येथून दोन टेम्पो गाजर, कर्नाटकमधून भुईमूग शेंगा तीन टेम्पो, मध्यप्रदेश आणि गुजरात येथून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले 1400 ते 1500 पोती, टॉमेटो पाच ते साडेपाच हजार पेटी, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 10 ते 12 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, भेंडी 8 ते 10 टेम्पो, शेवगा 3 ते 4 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, मटार 100 गोणी, काकडी 7 ते 8 टेम्पो, कारली 7 ते 8 टेम्पो, पावटा 5 ते 6 टेम्पो, भुईमूग 100 पोती, कांद्याची 125 ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून बटाट्याची 50 ट्रक इतकी आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : 80-110, बटाटा : 150-200, लसूण : 150-300, आले : सातारी : 400-500, बेंगलोर : 350-400, भेंडी : 150-250, गवार : 300-400, टोमॅटो : 40-80, दोडका : 200-300, हिरवी मिरची : 150-200, दुधी भोपळा : 60-140, चवळी : 150-200, काकडी : 100-140, कारली : हिरवी 250-300, पांढरी : 180-200, पापडी : 200-250, पडवळ : 160-180, फ्लॉवर : 120-180, कोबी : 40-80, वांगी : 150-250, डिंगरी : 160-180, नवलकोल : 80-100, ढोबळी मिरची : 150-200, तोंडली : कळी 250-300, जाड : 120-140, शेवगा : 300-350, गाजर : 100-160, वालवर : 250-300, बीट : 60-100, घेवडा : 200-250, कोहळा : 150-200, आर्वी : 250-300, घोसावळे : 160-180, ढेमसे : 200-250, भुईमूग : 300-350, पावटा : 250-300, मटार : 600-700, तांबडा भोपळा : 40-100, सुरण : 220-240, मका कणीस : 50-100, नारळ (शेकडा) : 1000-1600.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)