सर छोटु राम यांच्या पुतळ्याचे मोदींच्या हस्ते अनावरण

सांपला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शेतकऱ्यांचे नेते सर छोटू राम यांच्या 64 फुटी पुतळ्याचे हरियानातील रोहटक जिल्ह्यातल्या सांपला या गावी अनावरण करण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ तेथे उभारण्यात आलेल्या संग्रहालयालाही मोदींनी भेट दिली.

सर छोटुराम यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1881 साली झाला. स्वातंत्र्यपुर्व काळात त्यांनी शेतकऱ्यांचे नेतृत्व करीत त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचा सातत्याने प्रयत्न केला. शेतकऱ्यांचे मसिहा म्हणून ते परिचित होते. त्यांनी शेतकऱ्यांची अनेक आंदोलने घडवून तत्कालिन ब्रिटीश सरकारला शेतकरी हिताचे कायदे करणे भाग पाडले. प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा घडवला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून लोखंड गोळा करण्यात आले होते. सुमारे साडे पाच हजार शेतकऱ्यांनी पुतळा उभारणीसाठी लोखंड दान केले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)