सर्व सामान्यांना न्याय देणेसाठी कटीबध्द : आ. बाळासाहेब पाटील

खराडे : विविध विकास कामांच्या भूमीपुजन प्रसंगी आ. बाळासाहेब पाटील. समवेत सारंग पाटील, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, सौ. शालन माळी व मान्यवर.

मसूर, दि. 13 (प्रतिनिधी) : आदरणीय शरद पवार साहेबांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेस न्याय देणेसाठी कटीबध्द आहे, असे प्रतिपादन आ. बाळासाहेब पाटील यांनी केले.
खराडे, ता. कराड येथे आ. बाळासाहेब पाटील यांचे प्रयत्नाने व निधीतून पूर्ण झालेल्या व नव्याने मंजूर झालेल्या विकास कामांचे उद्‌घाटन व भूमीपूजन समारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सांरग पाटील (बाबा) हे होते. यावेळी समाज कल्याण समितीचे सभापती शिवाजी सर्वगोड, कराडच्या सभापती सौ.शालन माळी, जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, माजी सभापती देवराज पाटील, जयवंतराव साळुंखे, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अर्थसंकल्पातून मंजूर झालेल्या कालगाव ते खराडे फाट्यापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे उद्‌घाटन, जिल्हा वार्षिक योजनेतून कवठे ते खराडे दरम्यानच्या ओढ्यावरील पुलाचे उद्‌घाटन तसेच दलितवस्ती सुधार योजनेतून मंजूर झालेल्या मागासवर्गीय वसाहतीमधील रस्त्याचे कॉंक्रीटीकरण या कामाचे व कोयना भूकंप विकास निधीमधून मंजूर झालेल्या श्री बिरोबा मंदिरासमोरील सामाजिक सभागृहाचे भूमीपूजन करण्यात आले.
आ. पाटील म्हणाले, 6 जून 1976 रोजी कृष्णा नदीला महापूर आला होता व आजही तारीख 6 जून 2018 आहे, या महापूरासारख्या आपली माणसे शिकून निघाली व त्यामधून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यास जिद्द व चिकाटी निर्माण केली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी घालून दिलेली विकासाची परंपरा पुढे आदरणीय पी. डी. पाटील साहेब यांनी सुरु ठेवली व आपणही त्याच परंपरेनुसार सर्वांना बरोबर घेवून सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील आहे. या गावचा रेल्वे फाटकाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी महामहिम श्रीनिवास पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विकासाच्या त्रिसुत्री प्रमाणे पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत पैकी पंचायत समिती व जिल्हा परीषद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असल्याने व आमदार निधी असल्याने खराडे गावाच्या विकास कामासाठी झुकते माप मिळेल. आदरणीय शरद पवारसाहेब कृषी मंत्री असताना देशामधील शेतकऱ्यांना 72 हजार कोटी रूपयांची कर्जमाफी दिली. सहकारी साखर कारखानदारी टिकावी म्हणून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेवून त्यांनी ऊस उत्पादक शेतकरी व सहकारी साखर कारखानदारीला दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आत्ताचे सरकार या गोष्टींकडे विशेष लक्ष देत नाही. दरम्यान खराडे गावच्या आजपर्यंतच्या वाटचालीबाबत मी थोरोबा बोलतोय, या आषयाची चित्रफित युवक मित्र धैर्यशील जाधव यांनी सादर केली.
सारंग पाटील म्हणाले, सरकार खोटी आश्‍वासने देवून सत्तेवर आले आहे. त्यांचा ग्रामीण जनतेला नाहक त्रास होत आहे. आ. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराड उत्तरच्या विकासाची घोडदौड सुरू असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन सारंग पाटील यांनी केले. यावेळी समाजकल्याण समिती सभापती शिवाजी सर्वगोड, माजी सभापती देवराज पाटील मानसिंगराव जगदाळे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शरद बर्गे यांनी व प्रास्तावीक भिकोबा जाधव यांनी केले. अमृत जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास पंचायत समितीचे सदस्य रमेश चव्हाण, माजी सदस्य भाऊसाहेब चव्हाण, कारखान्याचे संचालक तानाजीराव जाधव, संजय जगदाळे, भास्करराव गोरे, पै. संजय थोरात, लहुराज जाधव, माजी संचालक लालासाहेब पाटील, बाबासो काळभोर, जयवंतराव साळंखे, बजरंग थोरात, उद्धवराव फाळके, पराग रामुगडे, योगेश चव्हाण, निसराळेचे उपसरपंच अंकुश घोरपडे, अरविंद जाधव, भरत शिंदे, जालिंदर जाधव, धैर्यशील जाधव, मारूती रामचंद्र जाधव, विलासराव जाधव, माजी सरपंच मारूती जाधव, पोपटराव जाधव, हणमंत राजाराम जाधव, संपतराव बर्गे, ज्ञानदेव जाधव, शरद बर्गे, संजय चव्हाण, तुकाराम जाधव, सुभाष जाधव, बजरंग जाधव, अनिल बर्गे, निवास जाधव, हणमंत जयसिंग जाधव, दादासो पुजारी, मोहन कांबळे, शामराव घुटूगडे, शामराव घुटूगडे, विठ्ठल घुटूगडे यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)