सर्व शाळांमध्ये बालभारतीची पुस्तके नाहीच

 इयत्ता पहिली, आठवी आणि दहावीचा यंदा नवा अभ्यासक्रम

पुणे – राज्यात सर्वत्र पुस्तके उपलब्ध केली आहेत, असा दावा बालभारतीने केला असला, तरी अजूनही पुणे महापालिकेच्या शाळेंतर्गतच इयत्ता पहिलीची मराठी आणि इंग्रजीची पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. बालभारतीची पुस्तके पहिल्याच दिवशी सर्व शाळांमध्ये दिली जाणार, असा दावा जरी शिक्षण विभागाने केला असला, तरी प्रत्यक्षात काहीच पुस्तके उपलब्ध असल्याचे समोर येते आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात यंदा इयत्ता पहिली, आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदलल्याने नवी पुस्तके बाजारात आली आहे. महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळाने (बालभारती) ही सर्व पुस्तके बाजारात उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले आहे. याबाबत बालभारती वितरण विभाग अधिकारी दत्तात्रय केत म्हणाले, “बालभारतीने पहिली ते बारावीच्या 10 कोटी 89 लाख पुस्तकांची छपाई केली आहे. यंदा पहिली, आठवी व दहावीचा पाठ्यक्रम बदलल्याने ही पुस्तके बाजारात आली आहेत. इयत्ता पहिलीची सर्व पुस्तके आम्ही 7 जून रोजीच उपलब्ध करुन दिली आहेत. तर आठवीची पुस्तके 17 ते 22 मे दरम्यानच उपलब्ध करुन दिली आहेत. फक्‍त इयत्ता पहिलीचे सिंधी व अरेबिक पुस्तक राहिले आहे, त्याचीही छपाई आज-उद्यामध्ये पूर्ण होईल. बाकी सर्व विषयांची पुस्तके आम्ही बाजारात उपलब्ध करुन दिली आहेत.’ दरम्यान, याबाबत बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

पुस्तक विक्रेते म्हणतात…
इयत्ता पहिली, आठवी व दहावीची जी सर्वसाधारण माध्यमे आहेत, त्यांची सर्व पुस्तके दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. पण, अजूनही पालिकेच्या शाळांपर्यंत मात्र बालभारतीची गाडी पोहचली नसल्याचेच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरुन समोर येते आहे.

पालिकेच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली व आठवीची पुस्तके पोहचली आहेत. पण, त्यामध्ये इयत्ता पहिलीसाठी बालभारतीची मराठी आणि इंग्रजीची पुस्तके आली नाहीत. तसेच इयत्ता आठवीची कन्नड व गुजराथी माध्यमाची पुस्तके नाहीत, अन्यथा अन्य सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशीच वाटप होतील.
– शिवाजी दौंडकर, प्रभारी शिक्षण प्रमुख, मनपा शिक्षण विभाग

इयत्ता आणि पुस्तकांची छपाई
1ली-25 शीर्षक- 91 लाख 40 हजार
8 वी-52 शीर्षक- 1 कोटी 53 लाख 16 हजार
10 वी – 87 शीर्षक- 1 कोटी 77 लाख 65 हजार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)