सर्व विरोधी पक्ष एकत्र निवडणूक लढवणार नाहीत

धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सर्वेसर्वा देवेगौडा यांचे भाकित

नवी दिल्ली – कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी एच.डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधीला उपस्थित असलेले राजकीय पक्षांनी भाजपविरोधात विरोधकांची एकजूट दाखवली असली, तरी 2019 च्या लोकसभा निवडणूकीमध्ये सर्व राज्यांमध्ये हे पक्ष एकत्र निवडणूक लढवतील, असे मानता येणार नाही, असे धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सर्वेसर्वा एच.डी. देवेगौडा यांनी म्हटले आहे. मात्र भाजपविरोधात तिसरी आघाडी लवकरात लवकर उभी राहण्यास आपली अनुकुलता असल्याचेही त्यांनी सांगितले. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लोकसभेची निवडणूक होण्याची शक्‍यता असून त्यासाठी तयार रहाण्याचे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी पक्षाने दिले असल्याचेही देवेगौडा यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जर कुमारस्वामींच्या शपथविधीसाठी उपस्थित असलेले पक्ष लोकसभेच्या निवडणूकीसाठी एकत्र यायलाच पाहिजे, अशी काही आवश्‍यकता नाही, असेही त्यांनी सांगितले. धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीच्या निमित्ताने ते पत्रकारांशी बोलत होते.

कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, बसपा, आप, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि तेलगू देसम या सहा पक्षांचे प्रमुख नेते बेंगळूरुमध्ये कुमारस्वामी यांच्या शपथविधीला उपस्थित राहिले होते. समाजवादी पार्टी आणि बसपाने उत्तर प्रदेशात प्रत्येकी 40 जागा लढवण्याबाबत चर्चा सुरू केली आहे. कर्नाटकमध्ये जेडीएस आणि कॉंग्रेसमध्ये किरकोळ मतभेद असले तरी एकत्र निवडणूक लढवली जाईल, असेही देवेगौडा यांनी स्पष्ट केले. मात्र कर्नाटकातील कॉंग्रेसचे जेडिएस समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या यांनी केलेल्या वक्‍तव्यावर देवेगौडा यांनी कोणतेही वक्‍तव्य केले नाही. कर्नाटकातील कुमारस्वामींचे सरकार वर्षभरच टिकेल, असे सिद्धरामय्या म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)