सर्व पेठांसह काही भागांत शुक्रवारी पाणीपुरवठा बंद

शनिवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणी

पुणे – पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, तसेच लष्कर जलकेंद्र, येथे विद्युत/ पंपिंग विषयक आणि स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत. तसेच पर्वती ते लष्कर जलकेंद्रादरम्यान 2,200 मि.मी. व्यासाच्या लाईनची तपासणी करून ती कार्यान्वित करण्यासाठी या पंपिंगच्या अखत्यारीतील पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. शनिवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

-Ads-

पाणी पुरवठा बंद असणारा भाग – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परीसर, कर्वे रस्ता, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्‍वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं. 42, 46, पर्वती टॅंकर भरणा केंद्र, पद्मावती टॅंकर भरणा केंद्र, प्रभात रस्ता, एरंडवणा गावठाण, पटवर्धन बाग, मंगेशकर हॉस्पिटल, करिष्मा सोसायटी भाग, चतु:शृंगी, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर गावठाण, पुणे स्टेशन, रेव्हेन्यु कॉलनी, सेनापती बापट रस्ता, जनवाडी, गोखलेनगर, शिवाजी हाउसिंग सोसायटी, वडारवाडी, पांडवनगर, भांडारकर रस्ता, फर्गसन कॉलेज रस्ता, जंगली महाराज रस्ता, लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी इ. ठिकाणी पाणी बंद राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)