सर्व धर्मीय शेतकरी वधू-वर परिचय मेळावा

वाकड – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा विवाह संस्कार विभागामार्फत येत्या 26 एप्रिलला नाशिक येथे सर्व जाती व धर्मीय शेतकऱ्यांच्या मुलां-मुलींसाठी निःशुल्क वधू-वर परिचय मेळावा होत आहे. पूर्व नोंदणीसाठी जवळच्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील प्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

डोंगरे वसती गृह मैदान, गंगापूर रोड, नाशिक येथे सकाळी 10 वा. परमपूज्य गुरू माऊली यांचे शिष्य तथा सुपुत्र आबासाहेब मोरे, नाशिकचे विभागीय धर्मादाय आयुक्‍तांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने मेळाव्यास प्रारंभ होईल. विवाहाविषयी समाजातील हुंडा, रुसवे-फुगवे, मान-सन्मान, अन्न नासाडी आदी अनिष्ट रुढींबाबत समाज प्रबोधन करणे, हीच विवाह संस्कार विभागाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

कर्जबाजारीपणा, सतत दुष्काळ, नापिकी, शहराकडे तरुणांचा वाढणारा ओढा, शेतीतील कामांविषयी वाढलेली अनास्था इत्यादी कारणांमुळे शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या विवाहाच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. मेळाव्यातून शेतकऱ्यांच्या पाल्यांना सुयोग्य जोडीदार मिळवण्याची सुवर्ण संधी देण्यात आली आहे. जमलेले विवाह श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्‍वर येथे विनामूल्य सामुदायिक विवाहात करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे, अशी माहिती थेरगाव येथील सेवा केंद्राने दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)