सर्व जगतात ज्ञानाची महती सर्वांत जास्त

शंकराचार्य विधुशेखर भारती:जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले शंकराचार्याचे दर्शन

सातारा, दि. 4 (प्रतिनिधी)- आजच्या काळात प्रत्येक माणसाला धनाचे महत्व असले तरी सर्वांत मौल्यवान असे ज्ञान आहे. धनाचे महत्व व्यावहारिक जगतात असले तरी जो ज्ञानसंपन्न आहे. त्याला सर्व जगात अधिक महत्व आहे प्रत्येकाने आपल्या प्रयत्नांनी स्वत:ला ज्ञान प्राप्त करुन घ्यावे, कारण ज्ञान मिळवण्यासाठी कोणतेही वय चालते जीवनात संपुर्ण आयुष्य माणूस हा ज्ञानाचा भूकेला हवा अशा शब्दांत श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्य जगतगुरू विधुशेखर भारती महास्वामी यांनी सातारा येथे उपस्थितांना मार्गदर्शन केले.

चिमणपूरा पेठेतील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळेत महास्वामींचे दोन दिवसाच्या मुक्कामात स्वामींच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये सातारा येथील कार्यक्रमाचे संयोजक वेदमुर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी समस्त सातारकरांचे वतीने महास्वामींना कृतज्ञता पत्र आणि सन्मानपत्र देउन गौरव केला.महावस्त्र, कंदीपेढ्यांचा हार,दक्षिणा,पुष्प असे या सत्काराचे स्वरुप होते.याप्रसंगी सन्मानपत्राचे वाचन प्रवरा करंदीकर यांनी केले. या सन्मानपत्राचे संस्कृत भाषेतून अतिशय सुरेख लेखन पुणे येथील परशूराम परांजपे यांनी केले होते.

यावेळी सातारच्या जिल्हाधिकरी श्वेता सिंघल यांनी उपस्थित राहून महास्वामींचे दर्शन घेतले. यावेळी महास्वामीनी विशेष आस्थापूर्वक जिल्ह्याच्या सर्व प्रकाराच्या घडामोडी विषयी जिल्हाधिकारी यांचेकडून माहीती घेतली. त्यानंतर महास्वामींनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की,भक्ती करताना एकाग्रता हवी अन्यथा नुसते शरीराचे श्रम होतात. कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक केल्यास ती साध्य होईल.जप,चिंतन, ध्यान,मनःपूर्वक व एकाग्रतेने करा तरच अपेक्षित देव साध्य होईल. सदगुरू कृपा व गुरूच्या पाठबळाशिवाय काहीही शक्‍य नाही. विद्यार्थ्यानी विद्याभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून अपेक्षित ध्येय गाठा. सातारा येथे मला येवून खूप आनंद मिळाला.
याप्रसंगी विवेकशास्त्री गोडबोले यांनी प्रास्ताविक करून महास्वामींनी सातारा येथे येवून समस्त सातारा जिल्हा वासियांवर आपल्या आशिर्वादाचा वर्षाव केला याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शरदभाई जानी, मोरेश्वरशास्त्री जोशी, श्रीकृष्णशास्त्री जोशी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सतेज कुलकर्णी यांनी केले.
मंगळवारी सकाळी 9 वा. नित्य चंद्रमोळेश्वर पुजा झाल्यावर सातारकर भाविकांसाठी महास्वामींचे थेट दर्शन आयोजित करण्यात आले होते. दु.12 पर्यत सातारा तसेच परजिल्हयातून भाविकांनी मोठया रांगा लावून स्वामींचे थेट दर्शन घेतले. दु.1 वा. महास्वामींच्या हस्ते चंद्रमोळीश्वराची विशेष षोडशोपचार पुजा संपन्न झाली त्यानंतर महास्वामींचे बारामतीकडे प्रस्थान झघले. उद्या बारामतीहून महास्वामी पुणे येथे 6 दिवसांच्या मुक्कामासाठी प्रयाण करणार आहे.

याप्रसंगी शंकराचार्य मठातील वेदमुर्ती शंकरशास्त्री दामले, गोविंदशास्त्री जोशी, श्रीकृष्णशास्त्री जोशी, दत्ताशास्त्री जोशी, मोरेश्वर जोशी चर्होलीकर, समथं सेवा मंडळाचे कायोंध्यक्ष ऍड.डॉ.डी.व्ही.देशपांडे, ज्येष्ठ करसल्लागार अरूण गोडबोले, बाळासाहेब प्रभुणे, ऍड. नारायण फडके,विश्वजीत गोडबोले, बापूसाहेब माजगावकर, दत्ता डोईफोडे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)