सर्व आधार केंद्र शासकीय जागेत स्थलांतरीत करा

प्रधान सचिवांचे आदेश, पण केंद्र चालकांचा प्रतिसाद मिळेना

पुणे – खासगी जागेत आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे सुरू असलेल्या सर्व आधार केंद्रांचे शासकीय जागेत स्थलांतर करण्याचे आदेश माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिवांनी महाऑनलाइनला दिले आहेत. मात्र, आतापर्यंत केवळ आठ आधार केंद्र चालकांनी शासकीय जागेत स्थलांतर केले आहे. त्यामुळे या स्थलांतर प्रक्रियेला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

खासगी जागेतील आधार केंद्रचालक सामान्य नागरिकांकडून आधार नोंदणी किंवा आधार दुरूस्तीसाठी अतिरिक्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया – युआयडीएआय) आधार केंद्रे शासकीय जागेत स्थलांतरित करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. माहिती तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त आदेशाची तातडीने अंमलबजावणी आणि त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवावा, अन्यथा आदेश देऊनही अहवाल सादर न केल्याबाबत महाऑनलाइनच्या वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबतचा अहवाल पाठवण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी तथा जिल्ह्याचे आधार समन्वयक अधिकारी सारंग कोडोलकर यांनी स्पष्ट केले आहे.

…अन्यथा कायदेशीर कारवाई
जे केंद्रचालक शासकीय जागेत स्थलांतर करणार नाहीत, अशा आधार यंत्रचालकांची नावे महाऑनलाइनने जिल्हा प्रशासनाकडे आणि नंतर “यूआयडीएआय’च्या मुंबई कार्यालयाकडे सादर केली जातील. या यादीतील सर्व आधार यंत्रचालकांकडून आधारची कामे काढून घेण्यात येणार आहेत. माहिती तंत्रज्ञान विभागाची आधार यंत्रे आहेत परंतु, त्यांचा आधार नोंदणीसाठी वापर करण्यात येत नाही, अशी सर्व आधार यंत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात येणार आहेत. अन्यथा, शासकीय मालमत्ता अनधिकृतपणे जवळ बाळगल्याप्रकरणी संबंधित केंद्रचालकावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)