सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या वेतनात 200 टक्के वाढ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय आणि 24 उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या वेतनात 200 टक्के वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने न्यायाधीशांच्या वेतनात वाढ केल्याची अधिसूचना जारी केली आहे. 27 जानेवारीच्या अधिसूचनेनुसार, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींचे प्रतिमहिना वेतन आता 1 लाख रुपयांवरून थेट 2.80 लाख रुपये होणार आहे. या वेतनाव्यतिरिक्त त्यांना सरकारी निवासस्थान, गाडी आणि कर्मचा-यांसह इतरही भत्ते मिळणार आहेत. तर नव्या अधिसूचनेनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांचे प्रतिमहिना वेतन 90 हजार रुपयांनी वाढून 2.50 लाख रुपयांपर्यंत जाणार आहे.
तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन 80 हजारांवरून 2.25 लाख रुपये प्रति महिना एवढं होणार आहे. न्यायाधीशांचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार वाढवण्यासंदर्भातही अनेक शिफारशी करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे याचा लाभ फक्त कार्यरत असलेल्या न्यायाधीशांनाच नव्हे, तर सेवानिवृत्त न्यायाधीशांनाही मिळणार आहे. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय संशोधन अधिनियम 2018नुसार न्यायाधीशांचे भत्ते वाढवण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)