सर्वोच्च न्यायालयाला सरकारने खोटी माहिती दिली – पृथ्वीराज चव्हाण

औरंगाबाद – राफेल खरेदीप्रकरणी सरकारने सर्वोच्च न्यायालयात खोटी माहिती देऊन जनतेची फसवणूक केली आहे. खोटी माहिती देणाऱ्याचे नाव पुढे आले पाहिजे व त्यावर कारवाई झाली पाहिजे. खरेदीच्या या अपारदर्शक प्रक्रियेवर चर्चा झाली पाहिजे. या खरेदी प्रकरणात हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. राफेल विमान खरेदीप्रकरण आहे तरी काय ? यावर शहरात आयोजित सामाजिक परिसंवादात ते बोलत होते.

प्रत्येक विमानाची किंमत हजार कोटींनी कशी वाढली ? सरकार ही माहिती गुप्त का ठेवतेय ? असा सवाल त्यांनी यावेळी केला.यावेळी त्यांनी राज्यातील प्रश्‍नासह विविध विषयांवरील अपयशाला आणि गैरव्यवस्थेला भारतीय जनता पक्षाला जबाबदार धरले. पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, राज्यात प्रचंड दुष्काळ आहे. मात्र फडणवीस सरकारने ऑक्‍टोबर या शेवटच्या दिवशी दुष्काळ जाहीर केला. सरकारने आधीच दुष्काळ जाहीर करायला हवा होता. सरकारचा पैसे वाचवण्याचा प्रकार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाच राज्याच्या निवडणूक निकालांची प्रचिती लोकसभा निवडणुकीत येणार आहे. मतदारांचा कौल आता स्पष्ट होत आहे.जनतेला काय हवे आणि कोण पाहिजे हे आता नक्की होऊ लागले आहे.लोकसभेसाठी या भागातून भाजपाच्या जागा कमी होतील, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. मोदी सरकारने आज पर्यंत अनेक आश्‍वासने दिली आहेत.मात्र हे केवळ बोलण्यापूरतेच आहे. केंद्र सरकारने आजपर्यंत दिलेली आश्वासने फोल ठरली असून, सरकारने घेतलेले तुघलकी निर्णय रद्द करावे व लोकोपयोगी निर्णय घ्यायला पाहिजेत. केवळ बोलण्याने प्रश्‍न आणि समस्या सुटणार नाहीत. यावेळी ते म्हणाले, आम्ही सत्तेत आल्यावर जीएसटीमध्ये बदल करू. आगामी निवडणुकांबाबत बोलताना ते म्हणाले की, राज्यामध्ये राष्ट्रवादी-कॉंग्रेस सोबत इतर समविचारी पक्षांसोबत चर्चा सुरू असून, प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षासोबत आमची आघाडी व्हावी, अशी इच्छा आहे. तसा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. निधर्मी तत्वावर येण्याची ज्यांची तयारी आहे त्यांचे स्वागत असेल.मात्र एमआयएम हा जातीयवादी पक्ष असल्यामुळे त्यांना सोबत घेणार नसल्याचेही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)