सर्वोच्च न्यायालयाने मागवली राफेल कराराची माहिती 

नवी दिल्ली – राफेल करारावरून राजकारण तापत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने आज भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या  करारासंबंधी केंद्र सरकारला सविस्तर माहिती मागवली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

याप्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायाधीश रंजन गोगई, न्यायाधीश एसके कौल आणि न्यायाधीश केएम जोसेफच्या बेंचने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले कि, आम्ही साकारविरुद्ध कोणतीही नोटीस जारी करत नाही. सरकारने राफेलची तांत्रिक माहिती न देता केवळ निर्णय प्रकियेचा तपशील बंद लिफाफ्यात सादर करुन न्यायालयाचे समाधान करावे, असे त्यांनी सांगितले.

-Ads-

याआधीही वकील मनोहर लाल आणि विनीत ढांडा याचिका यांनी राफेल करारावरून मोदी सरकारविरोधात याचिका दाखल केल्या होती. यामध्ये भारत आणि फ्रान्समधील कराराचा तपशील सार्वजनिक करण्याची तसेच किमतीचीही माहिती देण्याबाबत मागणी केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राफेल कराराची संपूर्ण प्रक्रियेची माहिती देण्यास सांगितले होते. मात्र, केंद्र सरकारने सर्व याचिका रद्द करण्याची मागणी केली आहे. केंद्राच्या म्हणण्यानुसार, सर्व याचिका राजकीय फायद्यासाठी दाखल करण्यात आल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)