सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तीकर विभागाला फटकारले

नवी दिल्ली: प्राप्तीकराशी संबंधित प्रलंबित खटल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने आज प्राप्तीकर विभागाची चांगलीच खरडपट्टी काढली. प्राप्तीकर विभागाकडून 596 दिवस जुन्या प्रकरणावर उशीराने आणि अपुरे स्पष्टिकरण दिले गेल्याचे निदर्शनास आल्यावर “सर्वोच्च न्यायालय म्हणजे पिकनिकचे ठिकाण नाही.’ अशा शब्दात न्यायालयाने राग व्यक्‍त केला.
गाझियाबादच्या प्राप्तीकर आयुक्‍तांकडून सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली. त्यावेळी अशाच स्वरुपाचे प्रकरण 2012 पासून सर्वोच्च न्यायालयापुढे प्रलंबित असल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

मात्र संबंधित प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाकडून सप्टेंबर 2012 मध्ये विचार करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाची दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली आहे आणि केंद्र सरकारचा विभाग असलेल्या प्राप्तीकर आयुक्‍तांनी हे प्रकरण अगदी साळसूदपणे घेतले आहे, ही बाब धक्कादायक असल्याचे न्यायालयाने सुनावले आणि दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)