सर्वोच्च न्यायालयात प्रथमच तीन महिला न्यायाधीश

नवी दिल्ली – न्या. इंदिरा बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर या न्यायालयात एकूण तीन महिला न्यायाधिश झाल्या असून अशा प्रकारची ही पहिलीच वेळ आहे. न्या बॅनर्जी या सर्वोच्च न्यायालयात नियुक्त केल्या गेलेल्या स्वातंत्र्यानंतरच्या आठव्या महिला न्यायाधिश आहेत.

न्या इंदिरा बॅनर्जी यांनी आत्ता पर्यंत आपल्या न्यायालयीन कारकिर्दीत कलकत्ता हायकोर्टात न्यायाधिश म्हणून काम पहिले असून त्यांना 2017 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली. त्यांचा कार्यकाळ 23 सप्टेंबर 2022 पर्यंत असणार आहे. सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या खेरीज इंदु मल्होत्रा आणि आर बानूमती या दोन महिला न्यायाधिश कार्यरत आहेत.

सर्वोच्च न्यायालय स्थापन झाल्यानंतर 39 वर्षांनी या न्यायालयावर फातीमा बिवी या पहिल्या महिला न्यायालयाची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)