सर्वोच्च न्यायालयात केवळ 30 सेकंदात संपली अयोध्या सुनावणी

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात आज अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख होती. यावेळी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी योग्य खंडपीठ स्थापन केले जाणार असून याच खंडपीठामार्फत 10 जानेवारी रोजी खटल्याच्या सुनावणीची तारीख जाहींर केली जाणार आहे असे सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले आहे.

आजची सुनावणी केवळ 30 सेंकदातच संपली. या खटल्यात विविध पक्षकारांच्या तर्फे हरिष साळवे आणि राजीव धवन हे बाजू मांडत आहेत त्यांना यावेळी त्यांचे म्हणणे मांडण्याचीही संधी मिळाली नाहीं. या आधीही सर्वोच्च न्यायालयाने फार सुनावणी न घेता त्याची तारीख 4 जानेवारी पर्यंत पुढे ढकलली होती. त्यावर देशभर मोठा गदारोळ झाला होता त्यामुळे आजच्या सुनावणीच्यावेळी काय होणार याचे औत्स्युक्‍य होते. पण कोर्टाने या विषयी सुनावणी कधी सुरू करायची याचा निर्णय संबंधीत खंडपीठातर्फे 10 जानेवारीला जाहीर होईल एवढेच जाहींर करून आजचे कामकाज संपवले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
9 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)