सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे संघाकडून स्वागत

नवी दिल्ली – अयोध्या प्रकरणाची सुनावणी तीन सदस्यीय पिठासमोर 29 ऑक्‍टोबरपासून करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वागत केले आहे. नवीन सुनावणीदरम्यान या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर मिळेल, अशी आशाही संघाने व्यक्‍त केली आहे.

मशिद इस्लामचा अविभाज्य भाग नाही, या पूर्वीच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने घटनापिठासमोर फेरसुनावणी करण्यास नकार दिला आहे. तसेच अयोध्या प्रकरणाची सुनावणी 29 ऑक्‍टोबरपासून नव्याने स्थापन होणाऱ्या पिठासमोर होणार आहे. ही सुनावणी वेगाने होईल, अशी आशा संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी व्यक्‍त केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सहजपणे निघणाऱ्या तोडग्याला कॉंग्रेसकडून विरोध होतो आहे. कॉंग्रेसकडून हा प्रश्‍न जिवंत ठेवला जात आहे, असेही इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)